अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- आदर्श गाव हिवरे बाजार ता.जि.अहमदनगर या गावात एप्रिल व मे महिन्यात एकूण ५० व्यक्ती कोरोना संक्रमित झाले होते.त्यापैकी ३२ रुग्ण गावात होते व १८ रुग्ण हे हिवरे बाजार येथील रहिवाशी परंतु कामानिमित्त बाहेरगावी असणारे होते.
त्यापैकी २ व्यक्तीचा मृत्यू झाला व ५ रुग्णांना व्हेनटीलेटरची आवश्यकता भासली होती.त्यापैकी २५ रुग्ण हे यशवंत कृषी ग्राम व पाणलोट विकास संस्थेच्या हिवरे बाजार प्रशिक्षण केंद्रावर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते व १८ रुग्ण हे स्वतच्या घरीच विलगीकरण कक्षात होते.
सध्या फक्त १ रुग्ण अॅकटीव आहे ते सिव्हील हॉस्पिटल अहमदनगर येथे उपचार घेत आहेत व १५ मे २०२१ पर्यत हिवरे बाजार गाव कोरोनामुक्त गाव करण्याचा संकल्प ग्रामपंचायत हिवरे बाजार,कोरोना समिती ,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हिवरे बाजार,यशवंत कृषी ग्राम व पाणलोट संस्था ,
ग्रामस्थ व स्वयसेवक यांनी केला आहे.यासाठी मुंबादेवी सहकारी दुध उत्पादक संस्था,वाहतूक करणारे गाडीमालक ,किराणा दुकानदार,प्राथमिक शाळा हिवरे बाजार शिक्षक ,यशवंत माध्यमिक विद्यालय शिक्षक या सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन केल्यामुळे शक्य झाले.
सध्या शेतीचे कामे जोरात चालू असल्यामुळे शेतात काम करण्यासाठी बाहेरचे कोकण,विदर्भ व परिसरातील जवळपास ३०० शेतमजूर काम करतात व सर्वाची वेळेवर तपासणी व शेतात विलगीकरण असल्यामुळे त्यांचा कुटुंबाशी संपर्क येत नाही.
यासाठी गावातील स्वयसेवकाचे ४ पथके तयार केले असून प्रत्येक आठवडयाला ऑक्सिजन व तापमान तपासणी करण्यात येते व त्यानुसार नोंदी ठेवण्यात आल्या आहेत.त्यात एखादा संशयित आढळलयास प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी खतगाव
तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हिवरे बाजार येथे नाकातील व घशातील दोन्ही तपासणी करण्यात येती.त्यानंतर तानवडे लॅब अहमदनगर येथे रक्त तपासणी करून तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळेत उपचार हे धोरण घेतल्यामुळे व प्रशिक्षण केंद्रावर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.
संक्रमित रुग्णांना प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील कर्मचारी मार्फत दिवसातून २ वेळा तपासणी केली जाते.तसेच गावातील ४ वाहने हि कोविड संक्रमित रुग्णाची तपासणी व उपचारासाठी ठेवण्यात आली आहेत. पद्मश्री पोपटराव पवार हे दररोज गावातील २५ कुटुंबाना भेट देऊन चर्चा करतात
तसेच प्रशिक्षण केद्रातील विलगीकरण कक्षाला सकाळ व संध्याकाळ भेटी देऊन कोरोनाबाधित रुग्णाशी चर्चा करतात व स्वतच्या घरी विलगीकरण कक्षातील रुग्णांना १ वेळ भेटून चर्चा करतात.तसेच हॉस्पिटल मधील रुग्णाशी दूरध्वनीवर बोलतात
तसेच संबंधित डॉक्टरांशी बोलणे यामुळे रुग्णाचे मनोबल वाढते व मनातील भीती दूर होते.ग्रामपंचायतने ऑक्सिमिटर,हॅण्ड ग्लोज,आयपॅड ,सॅनीटायझर ई सुविधा उपलब्ध केल्यामुळे कर्मचारी व स्वयसेवक बाधित झाले नाही.तसेच कोविड रुग्णासाठी वाहतूक करणारया वाहनाचे ड्रायव्हरची विशेष दक्षता घेतली जाते.
यासाठी यासाठी विशेष सहकार्य व समन्वयाची भूमिका डॉ.शिवानी देशपांडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हिवरे बाजार व त्यांचे सर्व सहकारी तसेच डॉ.शंकर केदार प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी
खातगाव,डॉ.राऊत,संतोष पाखरे कामगार तलाठी,सचिन थोरात ग्रामसेवक तसेच खाजगी डॉ.योगेश पवार ,डॉ.सुशील पादीर सौ.विमल ठाणगे सरपंच हिवरे बाजार ,विजय ठाणगे,दिपक ठाणगे यांचे लाभले.