अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम यांच्या अडचणीत भर पडली आहे. कारण एका गुन्ह्यात या दोघा भावांना अटक करण्यात आली आहे. आज त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

न्यायालयाने दोघांच्या पोलीस कोठडीत 24 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर शहरातील दिल्ली गेट परिसरात एका गाळेधारकाला दमदाटी करून

त्याला धमकावण्याचा प्रकार छिंदम व त्याच्या साथीदाराने केला होता. या प्रकरणी भगिरथ भानुदास बोडखे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात छिंदम बंधूंसह 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल आहे.

छिंदम बंधूंसह चारही जणांनी औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी छिंदम बंधूंचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले होते.

तर याच गुन्ह्यातील इतर दोन आरोपींना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. दरम्यान उपअधीक्षक ढुमे यांच्या पथकाने छिंदम बंधूंना अटक केली होती.

त्यांना न्यायालयाने 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आता त्यांच्या कोठडीत 24 सप्टेंबरपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे छिंदम बंधूंचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.