अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी सात पर्यंत १३ रुग्ण कोरोना बाधित सापडले, तर बेलापूर येथील एका शैक्षणिक संकुलातील दोन शिक्षक कोरोना बाधित झाल्याने काही दिवस हे संकुल बंद ठेवण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.
मागील आठवड्यात मालुंजा येथील दहावीची विद्यार्थिनी कोरोना बाधित सापडली होती.त्यावर स्थानिक शाळा व्यवस्थापन व ग्रामस्थांनी सात दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानंतर शुक्रवारी बेलापुरातील दोन शिक्षक बाधित निघाले आहेत. कोरोनाची साखळी तुटावी यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवस संपूर्ण शैक्षणिक संकुल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.