आमदार कानडेंना उद्देशून महसूलमंत्री म्हणाले “विठोबा” मला भेटला नाही अजून…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच नेवासा तालुक्यातील एका कृषी पर्यटनाला भेट दिली. यावेळी मंत्री थोरात यांनी आमदार लहू कानडे यांना उद्देशुन तुम्ही तिघेच मला भेटले पण “विठोबा” मला भेटला नाही अजून… असे म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याची लाट पसरली.

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवार दि.रोजी आमदार लहून कानडे व जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकऱ्यांसमवेत नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथे एका कृषी पर्यटन केंद्रला भेट देऊन शेततळे,

फळबागा, पोल्ट्री फार्म, गोट फार्म, प्रशिक्षण केंद्र आदींची माहिती घेतली. दरम्यान आमदार लहू कानडे यांनी चैतन्य कृषी पर्यटन केंद्र व कानडे परिवारा बद्दल माहिती दिली.

त्यावर बोलताना ना.थोरात यांनी आपल्या भाषणात अंकुश, लहू व अशोक कानडे हे तीन बंधू असा उल्लेख केला. त्यावर आ.कानडे म्हणाले साहेब आम्ही तीन नाही चार भाऊ आहोत, चौथा विठोबा हा शेती बघतो.

त्यावर ना.थोरात म्हणाले,”विठोबा” मला भेटला नाही अजून….अशी मार्मिक कोटी करताच एकच हसा पिकला.

Ahmednagarlive24 Office