Adhar Card Update : आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! सरकारने सुरु केली ‘ही’ खास सुविधा, असा घ्या लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Adhar Card Update : अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र म्हणजे आधार कार्ड होय. अनेक ठिकाणी आपल्याला आधार कार्ड लागते. त्यामुळे अशावेळी आधार कार्ड हे प्रत्येकाकडे असणे खूप गरजेचे आहे.

अशातच आता याच आधार कार्डबाबत मोठी अपडेट समोर आली असून सर्व आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. आधार अथॉरिटी म्हणजेच UIDAI कडून आधार कार्डबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. आधार कार्डधारकांसाठी एक खास सुविधा सुरु करण्यात आली आहे. काय आहे ही सुविधा जाणून घ्या.

समजा तुमच्याकडे 10 वर्षे जुने आधार कार्ड असल्यास ते लवकरात लवकर अपडेट करा, नाहीतर तुम्हाला खूप अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्चावा लागणार नाही. कारण तुम्ही हे काम अगदी मोफत करता करू शकता, यासाठी तुम्हाला अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्याव्या लागणार आहेत.

सुरु केली ही खास सुविधा

UIDAI या आधार कार्ड बनवणाऱ्या संस्थेने आता एका जबरदस्त योजनेला सुरुवात केली आहे. तुम्ही तुमचे 10 वर्षे जुने आधार कार्ड 14 जून 2023 पर्यंत UIDAI द्वारे अपडेट केल्यास तुम्हाला तुम्हाला एक रुपयाही खर्चावा लागणार नाही. कारण तुम्हाला हे काम अगदी मोफत करता येईल.

या अगोदर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 25 रुपये खर्चावे लागत होते. परंतु आता तुम्हाला फक्त जन सुविधा केंद्राचा खर्च भरावा लागणार आहे. हे काम मोफत करून तुम्ही सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकता. परंतु हे लक्षात ठेवा की काही कारणास्तव हे काम झाले नाही तर तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

आधार कार्ड हे आवश्यक कागदपत्र बनले आहे. जर तुमच्याकडे हे कागदपत्र नसेल तर तुम्ही कोणतेही आर्थिक काम करू शकत नाही तसेच कोणत्याही बँकेत तुम्हाला खाते उघडता येऊ शकत नाही.

UIDAI नुसार 14 जूनपर्यंत ही सेवा मोफत देण्यात येत आहे. हे तुम्ही घरच्या घरीच ऑनलाइन अपडेट करू शकता.त्यासाठी तुम्हाला मोबाइल किंवा लॅपटॉपवरून UIDAI वेबसाइटवर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर आधार क्रमांक टाकून ओटीपीद्वारे लॉग इन करावे लागेल. यानंतर, तुम्हाला डॉक्युमेंट अपडेटवर क्लिक करावे लागणार आहे.