ताज्या बातम्या

आदित्य ठाकरे निघाले ग्रामीण भागात, या दिवशी येणार नगर जिल्ह्यात

Published by
Ahmednagarlive24 Office

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे.मुंबईत अनेक सभा घेतल्यानंतर ते आता ग्रामीण भागात येत आहेत.

या यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे शनिवारी (२३ जुलै) नगर जिल्ह्यातील नेवासे व शिर्डी येणार आहेत. नेवाशात दुपारी २ वाजता व शिर्डीत सायंकाळी ५ वाजता त्यांचा मेळावा होणार आहे.

शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. नेवासा येथील आमदार शंकरराव गडाख मात्र ठाकरे यांच्या सोबत आहेत. तर नगर शहरात दोन गट पडले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात त्यांना कसा प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष लागले आहे.
ठाकरे यांची यात्रा गुरुवारी भिवंडी व नाशिकला होती. शुक्रवारी(२२ जुलै) मनमाड व औरंगाबादला जाईल व शनिवारी सकाळी पैठण, दुपारी नेवासे व सायंकाळी शिर्डी असा दौरा आहे.

Ahmednagarlive24 Office