कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर प्रशासनाची कारवाई

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले आहे.

मात्र जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत दुकानदारांकडून तसेच नागरिकांकडून प्रशासनाच्या आदेशाची खिल्ली उडवताना दिसत आहे.

मात्र कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

अशाच संगमनेर मधील एका हॉटेल चालकावर प्रशासनाने कारवाई केली आहे. संगमनेर तालुक्यातील समनापुर येथील प्रसिद्ध वडापाव सेंटर हे ग्राहकांचे केंद्रस्थान आहे.

या सेंटरवर गटविकास अधिकारी कोरोना प्रतिबंधक पथकाने कारवाई केली आहे. हे वडापाव सेंटर सात दिवसांसाठी सील करण्यात आले आहे.

याठिकाणी कोरोना उपाययोजनाची पायमल्ली केली जात असल्याचे आढळून आल्याने ही कारवाई केली गेली आहे.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून शहरात व तालुक्यात कडक निर्बंध करण्यात आलेले आहे.

जिल्हाधिकारी यांनी कडक कारवाईचे आदेश दिल्याने स्थानिक प्रशासनाने कंबर कसली आहे. नागरिकांनी देखील प्रसासानाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24