अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रशासन बजावणार नोटीस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-राहुरीच्या बाजारपेठेतील रस्त्यांवर अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या फळे विक्रेत्यांच्या हातगाड्या, दुकानांसमोर वाढलेली अतिक्रमणे, बेशिस्तपणे दुकानांसमोर उभी केलेली ग्राहकांची दुचाकी व चारचाकी वाहने यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होत असते.

बाजारपेठेला शिस्त लावण्यासाठी राहुरी पालिका व पोलिस यंत्रणेने धडक कारवाईचा बडगा उगारला. पालिकेने दुकानांसमोर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटीस बजावून, तात्काळ अतिक्रमण हटवण्याची ताकीद दिली.

बाजारपेठेतील वाढती वाहतूक कोंडीची समस्या मिटविण्यासाठी राहुरी नगरपालिका व पोलिस प्रशासन आक्रमक झाले आहे.

शनिवारी नवीपेठ येथे शनिचौक ते नगर-मनमाड महामार्गपर्यंत दुकानांच्या समोर वाहनांचे पार्किंग व हातगाड्यांसाठी पाच फुटापर्यंत रेषा आखण्यात आली. दुकानांसमोर अतिक्रमण करणाऱ्या व्यापार्‍यांना पालिकेतर्फे नोटिसा बजावण्यात आल्या.

राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक निलेश वाघ, पालिकेचे मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे, पोलिस व अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाईत भाग घेतला.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24