प्रशासनाचा दणका : ‘ह्या’ तालुक्यातील १४ दुकाने केली सील !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-  राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले ॲक्शन मोडवर आले असून, जे व्यावसाईक कोरोनाचे नियम पाळणार नाहीत.

आपल्या दुकानातील गर्दीवर नियंत्रण ठेवणार नाहीत, अशा दुकानांवर कारवाई करण्यात येणार असून, ती दुकाने सात दिवस पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचा यापूर्वीच इशारा दिला होता.

मात्र त्याकडे दुर्लक्ष करत हे नियम पायदळी तुडवल्याने जामखेड शहरातील तब्बल १४ दुकाने प्रशासनाने सील केली आहेत. नुकतीच जिल्हा अधिकारी राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबत जामखेड येथे बैठक घेण्यात आली होती.

या बैठकीत ग्रामीण भागासाठी तहसीलदार व शहरी भागासाठी मुख्याधिकारी यांना कारवाई व उपाय योजना करण्याचे अधिकार देण्यात आले असून, याच अधिकाराचा वापर करत नगरपरिषद प्रशासने कोरोनाचे नियम न पाळणारी १४ दुकाने सील करण्याची कारवाई गुरूवारी केली असून, अशी कारवाई निरंतर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

यात समृध्दी दूध, अंदुरे ब्रदर्स, अरिहंत गोळी सेंटर, घाडगे एजन्सी, स्वयंभुराज किराणा, महाराष्ट्र चायनीज सेंटर, शिवशंकर इलेक्ट्रॉनिक, रविंद्र कलेक्शन, त्रिमूर्ती भेळ सेंटर, इंदोर कलेक्शन, समृध्दी पेढेवाले, महाराष्ट्र शु सेंटर, मुंबई मोबाईल शॉपी अशी १४ दुकाने सात दिवसांसाठी सील करण्यात आली आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24