अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- येथील बाजार समितीच्या आवारात १९९९ नंतर केलेल्या बांधकामांना अद्यापपर्यंत परवानगी घेतलेली नाही. सर्वच बांधकामे ही अनधिकृत आहेत. सर्व्हिस रोड अस्तित्वात राहिले नाहीत.
२७ गाळे पाडण्याचे आदेश झाले आहेत. बाजार समिती चौकशी अंतिम अहवाल पणनच्या संचालकांपुढे फायनलला आहे. त्यामुळे बाजार समितीवर केव्हाही प्रशासक येवू शकते.
असा खळबळजनक दावा ज्येष्ठ नेते बाळासाहेब हराळ यांनी पत्रकार परिषदेत केला. तर नगर बाजार समितीच्या आवारातील कडबा मार्केटच्या समोरील जागेमध्ये सुरु असलेल्या सात भुखंडावरील संबंधित भूखंडधारकांनी महापालिकेची परवानगी न घेता बांधकाम सुरु केले आहे.
हे बांधकाम थांबविण्यात आले असल्याचे पत्र जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी उपोषणकर्त्यांना दिल्याची माहिती जिल्हा परिषदचे सदस्य संदेश कार्ले यांनी दिली.
कार्ले म्हणाले, बाजार समिती वाचली पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे या हेतुनेचे नगर तालुका महाविकास आघाडी व शेतकऱ्यांच्यावतीने उपोषण करण्यात आले.
गाळ्यांच्या करार नुतनीकरणातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. दोन दिवस वजन काटा बंद ठेवण्यात आला. वजन काट्याचीही जागा विकण्याचा डाव सत्ताधाऱ्यांचा असल्याचे त्यांनी सांगितले.