अहमदनगर जिल्ह्यातील कौतुकास्पद उपक्रम : व्हाॅटसअप ग्रुप तयार करुन गाय व म्हशीची ऑनलाईन बाजार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- घोडेगाव येथील जनावरांचा बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. येथे एक हजाराहून अधिक म्हशीची विक्री होवून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत होती.

मात्र आता कोरोना संसर्गाची स्थितीमुळे तीन महिन्यापासून बाजार बंद असल्याने हजारोंची रोजीरोटी थांबली आहे. घोडेगावसह, चांदे, सोनई,

शनिशिंगणापुर, लोहगाव, झापवाडी, शिंगवेतुकाई, वांजोळी येथील व्यापारी, दलाल व काही शेतक-यांनी व्हाॅटसअप ग्रुप तयार करुन यावर गाय व म्हशीचे छायाचित्र,

व्हिडिओ व त्यांचा बायोडाटा टाकत विक्री सुरु केली आहे. रस्त्यावरील स्थिती लक्षात घेवून हा व्यवसाय सध्या जिल्ह्यातच केला जात आहे.

अगोदर जनावराचे छायाचित्र पाठविले जाते. व्हिडिओ काॅलवर जनावर चालून दाखवले जाते. फोन पे, गुगल पे किंवा आरटीजीएस द्वारे पैशाची देवाण- घेवाण होत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24