अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- जिल्ह्यातील गावपातळीवर कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झालेला आहे. यामुळे तालुक्यातही बाधितांची संख्या वाढली आहे.
मात्र एकीकडे कोरोनाची बाधा सुरु असताना दुसरीकडे मात्र एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. आदर्श ग्राम म्हणून ओळख असलेले हिवरे बाजार गावाला गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाने ग्रासले होते.
मात्र, आदर्श ग्राम समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचे योग्य नियोजन आणि त्याला गावकऱ्यांनी दिलेली साथ यामुळे आता हिवरे बाजार कोरोनामुक्त झाले आहे.
हिवरे बाजारमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्याच्या शेवटी आढळला. यावेळी ग्रामसुरक्षा समिती आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत नियोजन केले.
आरोग्य यंत्रणा, ग्राम सुरक्षा समिती आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत नियोजन केले. आरोग्य यंत्रणा ग्रामसुरक्षा समिती यांची 4 पथके तयार केली.
गावातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी आरोग्य यंत्रणेने केली. तर ग्रामसुरक्षा कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना कडक नियम पाळण्यासाठी आवाहन करत बाधितांचे विलगीकरण केले.
ग्रामस्थांनी आवाहन केलेले नियम प्रमाणिकपणे पाळले. यामुळे गाव शंभर टक्के कोरोनामुक्त झाले, असे पोपटराव पवार यांनी सांगितले.