कौतुकास्पद कामगिरी ! ‘या’ गोष्टीत नगरचा राज्यात तिसरा क्रमांक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :-  गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख उंचावत चालला असल्याने जिल्हा पोलीस विभागाची प्रतिमा खूप मलीन झाली होती.

मात्र नुकतेच पोलीस दलासाठी काहीशी दिलासादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा पोलीस दलाने क्राईम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टिममध्ये (सीसीटीएनएस प्रणाली) केलेल्या उत्कृष्ट कामकाजासाठी नगरला राज्यात तिसरा क्रमांक मिळाला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज चालते. 2015 पासून राज्य पोलीस दलात सीसीटीएनएस प्रणाली कार्यन्वित करण्यात आली आहे. या प्रणालीत एक ते 21 फॉर्मची विभागणी केलेली आहे. यामध्ये होणार्या कामकाजासाठी गुण दिले जातात.

मार्च 2021 मध्ये गुन्हे अन्वेषण विभागाने अपर पोलीस महासंचालक यांच्या गुणांकानुसार राज्यातील 48 युनिटमधून नगरला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

या उत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सीसीटीएनएस विभागातील सहायक फौजदार

आर. डी. बारवकर, एस. एस. जोशी, ए. के गोलवड, पोलीस नाईक आर. व्ही. जाधव, एस. एस. काळे, के. पी ठुबे, एस. ए. भागवत, टी. एल. दराडे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24