अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- येत्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुका महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांप्रमाणे भाजपही स्वबळावर लढवणार असल्याचं सूतोवाच भाजप नेते, आमदार ॲड.आशिष शेलार यांनी केलं आहे.
त्यामुळं आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे व भाजप यांच्यामध्ये युतीचे होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आशिष शेलार यांनी सांगली दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे.
‘मुंबई महापालिका निवडणूक तुम्ही मनसेला सोबत घेऊन लढणार का? असा सवाल करण्यात आला. त्याला शेलार यांनी नाही असं उत्तर दिलं. त्यामुळं महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला सोबत घेणार नसल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
यामुळं मुंबई महापालिका निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार अंर्तगत वादानेच पडेल त्यासाठी आम्हाला काही कारण्याची गरज भासणार नाही.
तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हवामान बदलाप्रमाणे आपली वक्तव्य बदलताना दिसतात अशी टीकाही त्यांनी केली आहे.