अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-आज एक वर्ष झाले तरी अद्याप करोनाच्या प्रादुर्भाव कायम आहे. करोनावर लस आलेली असली तरी धोका कायम आहे.
अशा स्थितीत सर्वात जास्त गर्दी असलेल्या जिल्हा न्यायालयात वकिलांचा करोना पासून बचाव व्हावा यासाठी वकील संघटनेच्या प्रयत्नातून सर्व वकिलांना मोफत कोविड शिल्ड लस देण्यात येणार आहे.
महिला दिनानिमित्त महिला वकिलांना प्राधान्य देत लसीकरणास प्रारंभ केला आहे, अशी माहिती वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. भूषण बऱ्हाटे यांनी केले.
तसेच करोनावर मात करण्यासाठी सर्वांनी न घाबरता कोविड शिल्ड लस घ्यावी असे आवाहन केले. शहर वकील संघटनेच्या पुढाकारातून व महापालिकेच्या सहकार्याने मुकुंदनगर येथील
प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त महिला वकिलांसाठी मोफत कोविड शिल्ड लसीकरणाचा शुभारंभ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. रेवती देशपांडे यांच्या उपस्थितीत झाला.
सेन्ट्रल बार असोशिएशनच्या उपाध्यक्षा अॅड. सुजाता गुंदेचा यांना पहिली लस देण्यात आली. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. भूषण बऱ्हाटे,
सदस्य अॅड. सुनील तोडकर, नगरसेवक अॅड. राजेश कातोरे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश मोहळकर, अॅड. शिवाजी कोतकर, अॅड. संजय ठाणेकर आदी उपस्थित होते.