Surya Grahan 2023 : या वर्षी, वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी होत आहे. अमावस्या शनिवारी येत असल्याने याला शनी अमावस्या असेही म्हटले जाईल. येत्या १५ ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. सूर्य आणि बुध दोन्ही कन्या राशीत असतील. त्यामुळे बुधादित्य योग तयार होत आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार असा योगायोग 178 वर्षांनंतर घडत आहे. असा योगायोग 1845 साली घडल्याचे बोलले जात आहे. यावेळी, सूर्य ग्रह अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणेल. यशाची नवीन दारे उघडतील, तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असेल. चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण खूप शुभ राहील, धन-समृद्धीमध्ये वाढ होईल. यशाच्या नवीन संधी मिळतील. कुटुंबात समृद्धी येईल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्हाला आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळेल आणि हा काळ गुंतवणुकीसाठी उत्तम ठरू शकेल. यावेळी गुंतवणूक केल्यास तुम्हाला नक्की फायदा होईल, गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तूळ
ही सर्वपित्र अमावस्या तूळ राशीच्या लोकांसाठीही भाग्याची दारे उघडेल. देवी लक्ष्मी आपल्या आशीर्वादाचा वर्षाव करेल. व्यवसायात लाभ होईल. शत्रूंवर विजय मिळेल. आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळेल. उत्पन्न वाढू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. संपत्तीत वाढ होईल. तुम्ही आनंदी राहाल. या सगळ्यामुळे मुख्य तुमचे मन शांत आणि समाधानी राहील.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठीही येणारे सूर्यग्रहण फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक लाभ आणि यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला भौतिक सुखसोयींचा फायदा होईल आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तसेच कुटुंबातील वातावरण चांगले राहील.