अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलै २०२१ पासून सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहेत. त्यानुसार राज्यातील तब्बल 5 हजार 947 शाळाची घंटा वाजली आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यात दुसर्या दिवशी 151 शाळांमध्ये 14 हजार 778 विद्यार्थी यांची उपस्थिती नोंदवली गेली. करोनामुळे बंद असणार्या शाळा गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरु करण्यात आल्या होत्या.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गेल्या वर्षभरापासून प्रत्यक्षपणे शाळा भरलेली नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये. यासाठी ऑनलाइन वर्ग घेण्यात येत आहेत. परंतु शाळा बंद असल्याने होणारे परिणाम पाहता.
जी गावे करोनामुक्तआहेत. अथवा जिथे मागील तीस दिवसात एकही करोना बाधित आढळून आलेला नाही. अशा गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता.
त्यानुसार कोविड 19 चे सर्व नियम पाळत दोन दिवसांपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यात जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या 1 हजार 210 आठवी ते बारावीच्या शाळा आहेत.
यातील 135 खासगी व्यवस्थापनाच्या तर 15 या जिल्हा परिषदेच्या अशा 151 शाळांमध्ये शुक्रवारी आठवी ते बारावीचे वर्ग भरले.
जिल्ह्यात आठवी ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांचा 37 हजार 923 विद्यार्थ्यांचा पट आहे. यापैकी शुक्रवारी 14 हजार 778 विद्यार्थी काल शाळेत हजर होते.