अमरापूरकरनंतर खराडे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत नगरचे नांव उंचावले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा आणि महत्त्वाचा समजला जाणारा फिल्मफेअर अवॉर्ड नगरचे कलाकार असलेले कामोद खराडे यांना मिळाल्याबद्दल गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

त्यांनी थप्पड या हिंदी चित्रपटासाठी दिलेल्या सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाईनला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे. मिस्किन मळा येथील ट्रील म्युझिक अकॅडमी येथे झालेल्या सत्कार समारंभात खराडे यांचा श्रीरामपूरचे विभागीय पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके,

जनक आहुजा व सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत मुनोत, जय रंगलानी, मनयोग माखीजा, संतोष बडे, संजय वाळूंज, संगीत प्रशिक्षक अजीतसिंग वधवा, डॉ. गलांडे, प्रमोद जगताप, प्रितम गायकवाड, शुभम शेरकर, जस्मित वधवा,

सीमर वधवा, अनिरुध्द देशमुख, मोहसीन सय्यद, स्वराज गुजर, ओमकार पाटसकर आदी उपस्थित होते. नगर येथील कलाकार असून, 2004 पासून ते ध्वनी डिझाइनर आणि ध्वनी अभियंता म्हणून फिल्म इंडस्ट्रीजमध्ये कार्यरत आहे.

त्यांनी अनेक हिंदी चित्रपटाचे ध्वनी डिझाईन केले आहे. स्व. सदाशिव अमरापूरकर यांच्यानंतर फिल्मफेअर अवॉर्ड मिळवणारे ते नगरचे दुसरे कलाकार ठरले असून, त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत नगरचे नांव उंचावले असल्याची भावना हरजितसिंह वधवा यांनी व्यक्त केली.

पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांनी नगरच्या मातीत अनेक कलाकाररुपी हिरे दडलेले असून, जिल्ह्याच्या शिरपेचात या पुरस्काराने मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना व्यक्त केली.

पाहुण्यांचे स्वागत संगीत प्रशिक्षक अजीतसिंग वधवा यांनी केले. जनक आहुजा यांनी खराडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना कामोद खराडे यांनी फिल्म इंडस्ट्रीजमधील अनेक पैलूंचा उलगडा करुन संगीत व ध्वनी डिझाईनबद्दल माहिती दिली. तर नगरमधील संगीतप्रेमी कलाकारांसाठी मार्गदर्शन करणार असल्याची इच्छा व्यक्त केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24