अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Maharashtra News :- अमूलने दुधाच्या दरात वाढ केल्यानंतर आता मदर डेअरीचे दूधही महागले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचा खर्च, तेलाची किंमत आणि पॅकेजिंग मटेरिअलची किंमत यामुळे दुधाच्या दरात वाढ करण्यात आल्याचे मदर डेअरीच्या वतीने सांगण्यात आले. 6 मार्चपासून नवीन दर लागू होतील. प्रत्येक प्रकारच्या दुधावर नवीन दर लागू होणार आहेत.
यापूर्वी अमूल आणि पराग डेअरीने प्रतिलिटर 2 रुपयांनी दरवाढ जाहीर केली होती. उत्पादन खर्च वाढल्यानंतर दुधाच्या दरात वाढ करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपूर्वी अमूलने देशभरातील बाजारपेठेत दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही दरवाढ सोना, ताजा, शक्ती, टी-स्पेशल, तसेच गाय आणि म्हशीच्या दुधासह अमूल दुधाच्या सर्व ब्रँडवर लागू केली. तब्बल 7 महिने 27 दिवसांच्या कालावधीनंतर अमूलने दरात वाढ करण्यात येत आहे.