अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये लाभ मिळावा याकरिता सर्व कोरोना आजारावर उपचार घेतलेल्या रुग्णांचे बिले परत देण्यासाठी मनसेने आव्हान केल्यानंतर जवळपास जिल्ह्यातून ३०० अर्ज हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सादर झाले आहेत
यामध्ये सर्व रुग्णांनी ज्या हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना लाभ मिळतो आशा हॉस्पिटल मध्ये हे अर्ज सादर केलेले असून या संपूर्ण हॉस्पिटल कडून आपल्या उपचारावर खर्च झालेली रक्कम परत मिळविण्याकरता व शासनाकडून महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळविण्याकरिता मागणी मनसेच्या आवाहनानंतर केली आहे.
त्याच अनुषंगाने जवळपास जिल्ह्यातील ३०० कोरोना आजारावर उपचार घेतलेल्या रुग्णांनी अर्ज सादर केले असून त्या माध्यमातून राज्य आरोग्य हमी सोसायटी यांनी सर्व सदर हॉस्पिटल ला तक्रारी निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत व त्यामध्ये संपूर्ण रुग्णांचे पैसे परत करण्याचे आदेश सुद्धा या सदर नोटीस मध्ये दिलेले आहेत.
ज्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने मध्ये उपचार सुरू होते परंतु या सर्व हॉस्पिटलने महात्मा फुले जन आरोग्य योजनेची गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना माहिती दिली नसल्यामुळे या सर्व रुग्णांना कोरोना आजारावर उपचार करण्याचा खर्च व त्याचा त्रास सहन करावा लागला आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेत कोरोना आजारावर मोफत उपचार होत असल्यामुळे संबंधित हॉस्पिटलने कोरोना आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून पैसे आकारू नयेत तसेच या रुग्णांवर मोफत उपचार करावेत अशी मागणी मनसेकडून करण्यात आली तसेचतसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील हॉस्पिटल मध्ये ज्या रुग्णांनी कोरणा आजारावर उपचार घेतले अशा रुग्णांचे पैसे सुद्धा परत मिळू शकतात.
असे आवाहन केल्यानंतर ही सर्व बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उघड केल्यानंतर व महात्मा फुले जन आरोग्य योजने मध्ये आपल्याला सर्व रुग्णांना लाभ मिळू शकतो असे आवाहन केल्यानंतर एक ते दीड महिन्यात जिल्ह्यातून व शहरातून 300 अर्ज हे दाखल झालेले आहेत व त्यामध्ये नगर शहरातील जवळपास २१० अर्ज या योजनेमध्ये पाच हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे
विखे पाटील विळद घाट हॉस्पिटल ३५अर्ज :- नगर शहरातील हॉस्पिटल मध्ये तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना ऑफिस सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी अर्ज सादर झालेले असून बाकीचे अर्ज जिल्ह्यातील इतर हॉस्पिटल मधील आहेत
त्यामुळे कोरोना आजारावर उपचार घेतलेल्या सदर हॉस्पिटल मधील रुग्णांना एक मोठा दिलासा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे मिळणार आहे.अशी माहिती मनसेचे नितीन भुतारे यांनी दिली आहे. एप्रिल मे महिन्याच्या दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना
रुग्णांना उपचाराकरिता बेड मिळत नसल्या मुळे सदर हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून कोरणा आजारावर मोफत उपचाराची सोय सुविधा असताना देखील कोरोना आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्ण सदर हॉस्पिटल मध्ये दाखल
झाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती विचारल्या नंतर हॉस्पिटल कडून तुम्हाला बीड मिळेल परंतु योजनेचा लाभ मिळणार नाही असे लेखी अर्ज तुम्हाला द्यावे लागतील
त्यानंतर तुमच्यावर उपचार केले जाईल अशा धमक्यांचे प्रकार व ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार अनेक हॉस्पिटलकडून घडल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर आलेले आहेत
त्यामुळे अशा सर्व अर्जदारांना बरोबर घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून संबंधित महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा गैरवापर करणाऱ्या तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत
कोरोना आजारावर रूग्णांना उपचार नाकारणाऱ्या व सर्वसामान्य रुग्णांची गोरगरिबांची तसेच शासनाची फसवणूक करणाऱ्या हॉस्पिटलच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे अशी माहिती मनसेचे. नितीन भुतारे यांनी दिली आहे.