साहेबांपाठोपाठ आता पोलीस कर्मचाऱ्याची ऑडिओ क्लिप होतेय व्हायरल…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :-  वादग्रस्त ऑडिओ क्लिपमुळे अनेक पोलीस कर्मचारी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अनेकांवर कारवाई सुरु असून यातच नेवासा पोलीस ठाण्यातील ऑडिओ क्लिप सध्या चर्चेचा विषय ठरू लागल्या आहेत.

नुकतीच एका पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आता त्यापाठोपाठ एका पोलीस कर्मचाऱ्याची अशीच एक ऑडिओ क्लिप सध्या जोरदार व्हायरल होऊ लागली आहे.

सलग दुसऱ्या दिवशी पडलेल्या ऑडिओ बॉम्बमुळे जिल्ह्यातील पोलीस दलासह नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे. गुरुवारी नेवासा पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याची अवैध धंदा असणाऱ्या व्यक्तीबरोबर असलेल्या संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

त्यानंतर या प्रकारच्या चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्याची नियंत्रण कक्षात तत्काळ बदली करण्यात आली. त्या प्रकरणाची चर्चा तालुकाभर सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी एका पोलीस कर्मचाऱ्याची वाहन सोडण्याबाबतची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली.

त्यामुळे तालुक्यातील पाेलीस अधिकारी, कर्मचारी व अवैध व्यावसायिक यांच्यातील साटेलोटेची चर्चा रंगू लागली आहे. जनतेचे रक्षक करणारे पोलीस सध्या लाचखोरी आणि हप्ता वसुलीमध्ये चांगलेच मग्न झाले आहे. अवैध व्यावसायिकांना पाठीशी घालण्यासाठी स्वतःचे हात ओले करत कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवत आहे.

तसेच गेल्या काही दिवसांपासून अनेक पोलीस कर्मचारी लाचखोरी प्रकरणामुळे चौकशीच्या फेऱ्यात आहे. जिल्ह्यात पोलीस दलात दिवसेंदिवस लाचखोरी वाढत चालली असून पोलीस अधीक्षक मनोज पाटील याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसून येत नाही आहे. यामुळे जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा मलीन होऊ लागली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24