मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी वाळू तस्कराच्या मुसक्या आवळल्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- श्रीरामपूर शहरातील मिल्लतनगर ते गोंधवणी रोड येथील पुलाजवळ पोलिसांनी वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला.

यावेळी पोलिसांनी ट्रॅक्टर व त्यातील वाळू असा एकूण तीन लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याबाबत पोलीस शिपाई नरवडे यांच्या फिर्यादीवरून वाळूची तस्करी करणारा ट्रॅक्टर चालक गंगाधर गोरक्षनाथ सोनवणे (वय 35, रा. गोंधवणी, वॉर्ड नंबर 1, श्रीरामपूर) याच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

दरम्यान जिल्ह्यात वाळूतस्करांनी हौदास माजवला आहे. अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्या वाळू तस्करांवर कारवाईसाठी जाणाऱ्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांकडून होणारे हल्ले वाढले आहेत.

वाळू उत्खननातून अल्पावधीत अमाप पैसा मिळत असल्याने गावातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात या व्यवसायात उतरला आहे. वाळू उपसा करण्यासाठी सर्व सरकारी नियम पायदळी तुडवून दिवसरात्र वाळूचा उपसा सुरू आहे.

वाळू तस्करांनी त्यांची स्वतःची यंत्रणाही तयार केली असून ही यंत्रणाच आता महसूलच्या जीवावर उठली आहे.

या लढाईत महसूल यंत्रणा मात्र हतबल झाल्याचे दिसत आहे. मात्र आता त्यांना कायद्याचा धाक दाखविणे गरजेचे बनू लागले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24