अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपानं मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर नारायण राणेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
काही वेळेपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत त्यात त्यात नारायण राणे यांच्या सिंद्धिविनायक पॅनलचे ११ संचालक निवडून आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुक रिंगणात ऐकून १९ उमेदवार होते त्यापैकी भाजपचे ११ उमेदवार विजयी झाले तर विरोधी पॅनलचे ८ संचालक निवडून आले.
या विजयानंतर राणेंनी दिलेली प्रतिक्रिया
१) मिळालेला विजयाच्या पाठीमागे जिल्ह्यातील देवदेवता आणि जिल्ह्यातील जनता आहे. जनतेने भरभरून आशीर्वाद दिले आहेत त्यामुळेच माझा नव्हे तर भाजपचा विजय झाला आहे. आणि विजयाला निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली या सगळ्यांनी दिलेली साथ महत्वाची आहे.
या निवडणुकीत ज्यांना अक्कल आहे त्यांचा विजय झाला आहे. ज्यांना आमचे चेहरे पाहवत नाहीत त्यांना येणाऱ्या निवडणुकीत आम्ही त्यांना लोकप्रतिनिधित्व मिळून देणार नाहीत.
२ ) नको असलेलया चेहऱ्याबत फटकेबाजी
दरम्यान, जिल्हा बँकेतील या मोठ्या विजयानंतर आता पुढील नियोजन काय असेल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच नारायण राणे यांनी राज्यातील सरकारकडे रोख करत “आता यानंतरचं लक्ष्य महाराष्ट्रातील सत्तेचं आहे”, असं राणे म्हणाले. “आता लक्ष्य महाराष्ट्र सरकार. तिन्ही जिल्ह्यात ज्या काही विधानसभा होतील, त्यासोबत लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच असेल. नको असलेले, ज्यांचे चेहरे पाहवत नाहीत, अशा लोकांना आमचा जिल्हा लोकप्रतिनिधीपदी ठेवणार नाही”, असा खोचक टोला नारायण राणेंनी यावेळी लगावला.
३) मी अमित शहांना या गोष्टी पण सांगणार.
त्यांना वाटत असेल मी थांबलोय पण मी थांबलेलो नाही मी त्यांना पुरून उरलोय. “चौकश्या किती लावा मला चौकश्यानी फरक पडत नाही”.असं नारायण राणे म्हणाले. “अमित शाह यांना इथे घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. इथे पोलीस यंत्रणा कशा काम करतात, कोर्ट कचेऱ्या कशा होतात, कार्यकर्त्यांना कसा त्रास दिला जातोय हे सगळं त्यांना भेटून सांगणार आहे”, असंही राणे म्हणाले.