शेतकरी संकटात : पुन्हा एकदा उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- खरीपाची पिके ऐन बहरात असताना जानेवारीत झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच सलग तीन चार दिवस पडलेल्या धुक्यामुळे हरबरा व गव्हाच्या पिकासह कांद्याच्या पिकांना फटका बसला.

त्यातच पिके शेवटच्या पाण्यावर असताना महावितरणने थकीत विज बील वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केला यामुळे शेवटचे पाणी न मिळाल्याने पिकांना त्याचा फटका बसला आहे.

यामुळे यंदाच्या वर्षी शेतकर्‍यांना खरीपा पाठोपाठ रब्बी पिकाच्या उत्पन्नात मोठी घट येणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. राहाता तालुक्यात जवळपास 37 हजार हेक्टरवर खरीपाच्या सोयाबीन, बाजरी, मका, भुईमुग आदी पिकांची लागवड केली जाते.

चालु वर्षी अतिवृष्टीमुळे सोंगणीस आलेल्या खरीपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. डाळींब व पेरू बागांना झळ सहन करावी लागली. रब्बीसाठी मुबलक पाणी असल्यामुळे रब्बी पिकांचे क्षेत्र वाढले,

मात्र अपुरा व कमी दाबाने विज पुरवठा, विज बील वसुलीसाठी रोहीत्र बंद करणे, हवामानात झालेले बदल यामुळे रब्बीच्या पिकांनाही फटका बसला असून हरबरा, गव्हाचे सरासरी उत्पन्नात घट झाली आहे.

त्यातच इंधन दरवाढीमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. कमी उत्पन्नामुळे सोयाबीन, हरबरा, कांद्याने मात्र भाव खाल्ला आहे.

राहाता तालुक्यात जवळपास सात हजार हेक्टरवरील पिके अतिवृष्टीने वाया गेली. त्यामुळे चालु वर्षी शेतकर्‍यांना खरीपापाठोपाठ रब्बी पिकाच्या उत्पन्नात मोठी घट येणार आहे.

डाळींब व पेरू उत्पादकांसाठी अतिवृष्टीमुळे चालु वर्ष वाया गेले आहे. सलगच्या पावसाने फळबागांचे मोठे नुकसान झाले. धरलेल्या बांगामधुन उत्पादन खर्चही मिळाला नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
Tags: Rahata