बिबट्यानंतर आता ‘या’ प्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी झाला जखमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या होत्या.

मात्रा आता रानडुकराच्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाले असल्याची धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा तालुक्यातील देडगाव येथील बापू हिवाळे आपल्या शेतात काम करत असताना तेथे अचानक आलेल्या रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात त्यांच्या पायाला जबर जखम झाली. रानडुकराने हल्ला करताच बापू यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकरी धावत आले.

परंतु तोपर्यंत रानडुकराने तेथून धूम ठोकली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बापू हिवाळे यांना उपचारासाठी कुकाणा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.

घटनास्थळी त्यांना रानडुकरच्या पायाचे ठसे आढळले. यावेळी वनरक्षक गाढे यांनी या परिसरात पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24