अनलॉकनंतर रेल्वेचे प्लॅटफॉर्म दरही उतरले…तिकीटाची किंमत पूर्वरत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- अनलाॅक झाल्यानंतर आता रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद हळूहळू वाढत आहे. यातच रेल्वे विभागाने प्रवाश्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाकाळात रेल्वेस्थानकावर होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी ५० रुपये केलेले प्लॅटफाॅर्म तिकीट आता पुन्हा पूर्वीप्रमाणे १० रुपये करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले होते.

अशाही काळात रेल्वेस्थानकावर प्रवाशांसोबत नातेवाईक गर्दी करीत असल्याने त्याला चाप बसण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफाॅर्म तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये केले. त्यानंंतर काही दिवसांत प्रवाशांसोबत येणाऱ्यांची संख्या कमी झाली.

दरम्यान, एप्रिल, मे महिन्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढल्याने रेल्वेचे प्रवासीही कमी झाले.दरम्यान आता १५ जूनपासून निर्बंध हटल्याने सर्वत्र व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांत पुन्हा वाढ होत आहे.

लाॅकडाऊनमध्ये प्लॅटफाॅर्म तिकीट वाढले तरी लाॅकडाऊनमुळे अनेक गाड्या बंद झाल्या. त्यामुळे प्रवासीही कमी झाले. परिणामी प्लॅटफाॅर्म तिकिटातून रेल्वेस्थानकाला फारशी कमाई झाली नाही.

दरम्यान १५ जूनपासून निर्बंध हटल्याने सर्वत्र व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांत पुन्हा वाढ होत आहे. नगरमधून उत्तर व दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24