अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- 19 नोव्हेंबर 2020 रोजी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी देवी मंदिराच्या गाभार्यातील 17 किलो वजनाच्या चांदीची चोरी झाल्याची घटना घडली होती.
या चोरीच्या घटनेला तब्बल 3 महिने झाले मात्र पोलिसांना अद्यापही चोरटे सापडलेले नाही. यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान या चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ अनेकदा आंदोलने देखील करण्यात आले आहे. नागरिकांनी नगर-औरंगाबाद मार्गावर एक तास रास्तारोको आंदोलन करत चोरट्यांना तातडीने शोधण्यात यावा अशी मागणी देखील केली होती.
यावेळी पोलिसांनी 15 दिवसांचे आश्वसन देत एका संशयिताला देखील ताब्यात घेतेले होते. परंतु तो पकडलेला व्यक्ती संशयितच निघाला व मुख्य आरोपी मात्र अद्यापही फरारच आहे.
त्यामुळे चोरट्यांचा तपास लागणार की नाही? याची शंका ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. दरम्यान पोलीस खात्यावरील विश्वास टिकवण्यासाठी तरी पोलिसांनी गांभीर्याने घेऊन हा तपास पुन्हा हाताळावा व आरोपींना अटक करून ग्रामस्थांचा पोलीस खात्यावरील विश्वास टिकवावा, अशी मागणी होत आहे.