अग्नितांडव ! शेतकऱ्याचा १० ते १२ एकर ऊस जळून खाक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे दुर्दैवी घटना घडली आहे. ऊसाला लागलेल्या आगीत सुमारे १० ते १२ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

ही आग आज दुपारी पावणे तीन वाजेच्या दरम्यान लागली असल्याची माहिती समजते आहे. दरम्यान वाऱ्याचा जोर आणि आगीचा लोट एवढा मोठा होता की जवळ जवळ लागून असलेल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांचा ऊस या आगीच्या लपेटात येऊन जळून गेला.

ही आग लागल्याचे निदर्शनास येताच अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या आग अग्निशामक बंब पाचारण करण्यात आला.

त्या बंबद्वारे ही आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता तसेच या आगीची तीव्रताही प्रचंड असल्याने सुमारे १० ते १२ एकर ऊस या आगीने आपल्या कवेत घेतला आणि जळून खाक झाला.

यामध्ये काही एकर ऊस हा तोडणीच्या प्रतीक्षेत होता, तर काही सहा महिन्यांचा होता त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या आगीची झळ या ऊसाच्या शेताला लागूनच असलेल्या चारा पिकांना व शेतातील कांदा पिकालाही बसली. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24