अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- रासायनिक खतांचे वाढलेले भाव कमी न केल्यास आंदोलन करणार असा इशारा शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांनी केंद्रीय रसायने व खते मंत्री डी.व्ही सदानंद गोवडा यांना निवेदनाद्वरे दिला आहे.
गेल्या दीड वर्षा पासून कोरोना महामारीमुळे बाजारात मंदी आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमाला भाव मिळत नाही.
आशातच चालू वर्षी खरीप हंगाम तोंडावर असताना केंद्र सरकारने रासायनिक खतांचे भाव हे सहा पट्टीने वाढवले.
पूर्वी डीएपी खताची गोणी ११८५ रूपयांना होती पण आता १९०० रूपयांना झाली तसेच पूर्वी १०:२६:२६ खतांची गोणी ११७५ रूपयांना होती
पण हीच गोणी घेण्यासाठी १७७५ रूपये शेतक_ऱ्यांना मोजावे लागणार आहेत. केंद्र सरकारने रासायनिक खतांचे भाव वाढ करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
सरकारने वाढवलेले भाव कमी करावेत अन्यथा शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांनी आंदोलनाचा इशारा निवेदनद्वरे दिला आहे.