ताज्या बातम्या

कृषी पंपाची थकबाकी होतेय माफ; शेतकऱ्यांनी घ्या ‘या’ तारखेच्या आत लाभ

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Krushi News :- सध्या राज्यात शेतकऱ्यांनी कृषी पंपाचे वीज बिल भरण्यासाठी महावितरणाकडून गावागावात कृषी वीज ग्राहक मेळाव्याचे आयोजन करून कृषी पंपाच्या थकबाकी बाबद शेतकऱ्याच्या तक्रारी निकालात काढण्यात येत आहेत.

शेतकऱ्यांनी आपल्या कृषी पंपाच्या थकबाकी सूट मिळवायची आसल्यास 31मार्च 2022 च्या आता भरणा केल्यास उर्वरित वीज बिलात 50 टक्के थकबाकी माफ होणार आहे.

त्यासंदर्भात ऊर्जामंत्री ‍डॉ.‍नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार वीजबिलासह शेतकऱ्यांच्या सर्व वीजविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी 10 मार्च ते 31 मार्च या कालावधीत विविध गावांमध्ये मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात कृषी ग्राहकांच्या बिल दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करून दुरुस्तीनंतरची सुधारित थकबाकीची रक्कम ग्राहकांना तात्काळ कळविण्यात येत आहे.

जागेवरच तातडीने तक्रार निवारण झाल्याने वीजबिल भरण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा कायम आहे. तर यासंदर्भात महावितरणच्या वतीने जळगाव जिल्ह्यात 129 मेळाव्यांत 311, नंदुरबार जिल्ह्यात 30 मेळाव्यांत 155, तर धुळे जिल्ह्यात 28 मेळाव्यांत 99 वीज बिलाच्या तक्रारी निकाली काढण्यात आल्या.

तक्रारींचे निवारण करण्यासाठी 10 मार्च ते 31 मार्च या कालावधीत कृषी ग्राहकांनी आपले बिल भरून या थकबाकीमुक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office