Agriculture News : भारतात पशुपालन (Animal Husbandry) मोठ्या प्रमाणात केले जाते. हा एक शेती पूरक व्यवसाय (Agriculture Business) असल्याने शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात पशुपालन करत आहेत. याशिवाय पशूंचे संगोपन काही लोक पॅशन किंवा छंद म्हणून देखील करत असतात.
मित्रांनो आपल्या देशात गाई-म्हशींचे संगोपन करणारे अनेक प्राणीप्रेमी आहेत. काही प्राणी प्रेमी करोडो रुपयांच्या गाई म्हशींचे संगोपन करत असतात. आतापर्यंत तुम्ही एक कोटी, दोन कोटी किंवा तीन कोटी पर्यंत किंमत असलेल्या प्राण्यांविषयी ऐकले असेल.
मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका रेड्याविषयी सांगणार आहोत ज्याची किंमत ऐकून कदाचित तुम्हाला घाम फुटू शकतो. हो बरोबर ऐकलं तुम्ही, मित्रांनो आज आम्ही तुम्हाला हरियाणामधील अशा एका रेड्या विषयी सांगणार आहोत ज्याची किंमत रोल्स रॉयस कार पेक्षाही अधिक आहे.
आज आम्ही तुम्हाला हरियाणातील गोलू-2 या रेड्या विषयी सांगणार आहोत. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर या रेड्याचे (Viral Buffalo) वजन तब्बल दीड टन आहे. वजनाप्रमाणे त्याच्या किमतीत देखील वजन आहे. मित्रांनो एका मीडिया रिपोर्टनुसार या गोलू 2 (expensive Buffalo) रेड्याची बाजारात किंमत तब्बल दहा कोटी रुपये आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या रेड्याच्या (Expensive Buffalo Price) विशेषता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या व्हीव्हीआयपी रेड्याविषयी (Viral News).
चित्रकूटच्या दीनदयाल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या उद्योजकता विद्यापीठ चित्रकूटमध्ये आयोजित चार दिवसीय ग्रामोदय यात्रेत एक रेडा आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. आकर्षण बनण्याचं कारण देखील तेवढेच खास आहे. या रेड्याची किंमत 10 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे हा रेडा या पशुप्रदर्शनामध्ये चांगलाच चर्चेत राहिला आहे. गोलू 2 असे या रेड्याचे नाव सांगितले जात आहे.
येथील प्रदर्शनात उपस्थित असलेल्या म्हशींना पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येत आहेत. हा रेडा पानिपत, हरियाणातील पद्मश्री पुरस्कार विजेते शेतकरी नरेंद्र सिंग यांचा आहे. शेतकरी नरेंद्र सिंग 12वी पास आहेत. मात्र शेती आणि पशुपालनातं त्यांना विशेष गोडी आहे. चित्रकूटमध्ये सुरू असलेल्या ग्रामोदय जत्रेत त्यांनी गोलू-2 हा रेडा प्रदर्शित करण्यासाठी आणला आहे.
प्रदर्शनात उपस्थित असलेला हा रेडा शेकडो लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. हा रेडा खरोखर सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. जे पाहून तुम्हीही आकर्षित होणारच आहात. हरियाणातील पानिपत येथून आलेल्या नरेंद्र सिंह या शेतकऱ्याने या रेड्याबद्दल सांगितले की, या रेड्याचे आजोबांचे नाव गोलू-1 होते.
हे शुद्ध मुर्राह प्रजातीचे आहे आणि त्याची आई दररोज 26 लिटर दूध देते. गोलू 2 चे वजन 1.5 टन आहे आणि त्याचे वय 4 वर्षे 6 महिने आहे. गोलूच्या वडिलांचे नाव PC 483 आहे, ज्याला त्यांनी हरियाणा सरकारला जाती सुधारण्यासाठी दिले आहे.