अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेवगाव तालुक्याचा दौरा केला आहे. यावेळी त्यांनी तालुक्यातील वरूर, खरडगाव, डोंगर आखेगाव, आखेगाव तितर्फा येथे भेटी देत नुकसानीची पाहणी केली.
तसेच नदीकाठच्या गावांमधील जमीन खरडून झालेल्या नुकसानीची माहिती त्वरित सादर करण्यास सांगितले. दरम्यान कृषी अधिकाऱ्यांनी या पाहणी दौऱ्या दरम्यान शेतकऱ्यांना भेटून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर शासकीय मदत मिळेल असे सांगितले.
त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी विलास नलगे यांनी बोधेगाव येथे अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकाची पाहणी केली. केलेल्या पंचनामे बद्दल माहिती घेतली.
यावेळी कृषी सहाय्यक किशोर वाबळे, गणेश पवार ,कृषी सहाय्यक किरण पवार, एकनाथ चेमटे, गजानन चव्हाण, सुभाष बारगजे, संजय काटे, नितीन पायघन, श्रीधर कर्पे,
अमोल काटे, बाळासाहेब काकडे, भानुदास पालवे, ऋषिकेश विघ्ने, शिवाजी काकडे, बाबासाहेब काकडे, आबासाहेब काकडे दगडखैर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.