अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव अद्यापही सुरू असून, नियम पाळणे हाच एक रामबाण उपाय आहे. परंतु, अनेक ठिकाणी नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होताना दिसून येत आहे. कोपरगाव शहरात तर विनामास्क रस्ता अडवून, रस्त्यावर मुरुम टाकून तो पसरविताना व गर्दी करुन एका वृत्तवाहिनीला बातमी देताना आणि हातात कोल्हे गटाच्या निषेधाचे फलक घेऊन राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिसून आले.
या प्रकरणी शासनाला कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना दिली नसल्याने तब्बल शंभर पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर शहर पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पावसाळा सुरू असून कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. यामुळे खड्ड्यांत पाणी साठून डासांची उत्पत्ती होते तर चिखल तयार होऊन वाहनचालकांसह वाटसरुंना कसरत करावी लागते.
पालिकेला लाखो रुपयांचा कर भरुनही मुलभूत सुविधा पुरविण्यात पालिका राजकारणामुळे असमर्थ ठरत आहे. याचा नाहक त्रास शहरवासियांना सोसावा लागत आहे. तत्पूर्वी पालिकेकडून या रस्त्यांचे नूतनीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध झाला होता. परंतु, कोल्हे गटातील नगरसेवकांच्या विरोधामुळे ही कामे रखडली आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी रस्त्यावर मुरुम टाकून कोल्हे गटाचा निषेध नोंदविला. मात्र, याबाबत इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदारांची कोणतीही परवानगी न घेता अथवा पूर्वसूचना न देता निषेध आंदोलन केले.
यामुळे जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग आणि कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी राम खारतोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी गुरनं.279/2021 भादंवि कलम 341, 188 (2), 269, 270, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1)(3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी.पवार हे करत आहे.
यांच्यावर झाले गुन्हे दाखल सुनील वसंतराव गंगुले, मंदार सुभाष पहाडे, अनिल शिवाजी गायकवाड, सुनील जनार्दन फंड, गणेश अंबादास लकारे, भरत आसाराम मोरे, तुषार संजय पोटे, नवाज वहाब कुरेशी, कलविंदर हरितसिंग दडियाल, निखील नंदकुमार डांगे, एकनाथ उर्फ बाल्या कैलास गंगुले,
वीरेन ज्ञानदेव बोरावके, ऋषीकेश सुनील खैरनार, राजेंद्र शंकरराव वाकचौरे, संदीप सावळेराम पगारे, संदीप शरद कपिले, विकास श्रीराम शर्मा, चंद्रशेखर सुधाकर म्हस्के, सुनील आसाराम साळुंखे, गगन पंडू हाडा, अजित मोहिद्दीन शेख, राहुल वियकुमार देशपांडे, बाळासाहेब पिराजी साळुंखे,
फकीर मोहम्मद कुरेशी, कार्तिक सरदार, शिवम ठकाजी लसुरे, धनंजय कांतीभाई कहार, अक्षय मिनीनाथ आग्रे, योगेश कांतीलाल गंगवाल, दिनेश मधुकर पवार, राहुल बाळकृष्ण देवळालीकर, संदीप सुरेश देवळालीकर, अशोक गंगाधर आव्हाटे, सुनील वामन शिलेदार,
महेंद्र रवींद्र उदावंत, रावसाहेब चंदू साठे, विजय प्रभाकर त्रिभुवन, इम्तियाज रफीक पठाण यांसह 100 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.