निमगाव वाघात अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साध्या पध्दतीने साजरी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साध्या पध्दतीने घरातच साजरी करण्यात आली.

दरवर्षी संस्थेच्या वतीने जयंती निमित्त विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. मात्र मागील वर्षापासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जयंती उत्सवाचे कार्यक्रम रद्द करुन साध्या पध्दतीने जयंती साजरी करण्यात आली.

प्रारंभी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, संतोष कदम, डोंगरे संस्थेच्या सचिव मंदाताई डोंगरे, शासनाचा आदर्श युवती पुरस्कार प्राप्त प्रियंका डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, युवा मंडळाच्या सचिव प्रतिभा डोंगरे, अक्षरा येवले आदी उपस्थित होते.

पै.नाना डोंगरे म्हणाले की, समाजातील अनिष्ट प्रथा, रुढी व परंपरेला छेद देत अहिल्यादेवी होळकर यांनी जागृती केली. जनतेचे प्रश्‍न सोडविण्यास त्यांनी प्राधान्य दिले.

जनतेसाठी कल्याणकारी राज्य करताना त्यांनी मंदीरे व नदीघाट बांधले. अनेक मंदिराचा जीर्णोध्दार केला. कोरोनाच्या संकटकाळात जनतेसाठी असलेले त्यांचे कल्याणकारी राज्याचे कार्य व विचार प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रियंका डोंगरे यांनी समाज हितासाठी बदल घडविण्यात अहिल्यादेवी होळकरांचे मोठे योगदान आहे. महिलांसाठी त्यांचे कार्य स्फुर्तीस्थान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अहमदनगर लाईव्ह 24