हप्ता मागणाऱ्या अहमदनगर शहरातील आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- हप्ता नाही दिला तर सत्तूर डोक्यात घालीन, अशी धमकी देऊन शिवीगाळ, दमदाटी करणाऱ्या अटक आरोपी अमोल प्रदीप कदम (वय २६, रा. गांधीनगर, बोल्हेगाव अहमदनगर) याला तोफखाना पोलीस ठाण्याचे सपोनि डी. एम. मुंडे यांनी न्यायालयासमोर हजर केले असता

आरोपी कदम याला न्यायालयाने ७ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरुवार (दि.८) दुपारी 4:30 ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान आरोपी अमोल प्रदीप कदम व विजय भगवान कु-हाडे (वय 26 रा. गांधीनगर, बोल्हेगाव, अहमदनगर) ही दोघे चिकन-मटण माशाच्या दुकानावर आले.

दुकानातील कामगार नवाज शेख व अन्सार शेख यांना दररोज 500 रुपये हप्ता द्या, असा हप्ता नाही दिला तर सत्तूर डोक्यात घालीन, अशी धमकी देऊन त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून बळजबरीने त्यांच्याकडून 50 रुपये काढून घेतले.

सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आरोपी दोघे तेथे आले. त्या ठिकाणी गर्दीमध्ये उभा असलेला असीफ कदीर पठाण व स्वतः (फिर्यादीवर) हातातील कोयत्याने वार केला. परंतु डावा हात आडवा घातल्याने तो कोयता डाव्या हाताला लागला.

त्या दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून आरोपी अमोल प्रदीप कदम याने खिशातील ७०० रुपये काढून घेतले आहे. त्यावेळी ते दोघे पळून जाऊन लागले तेव्हा तेथील जमलेल्या लोकांनी त्या दोघांना मारहाण करून आरोपी अमोल कदम याला लोकांनी पकडले.

तर गर्दीचा फायदा घेऊन आरोपी विजय कु-हाडे हा कोयता घेऊन पळून गेला आहे, या योगेश शिवाजी आव्हाड (रा. राजेगाव, ता. नेवासा जि. अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अहमदनगर लाईव्ह 24