अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-   कोरोना विरोधात अहमदनगर जिंकत आहेत ! होय… गेल्या महिन्यात सातत्याने वाढणारी रुग्ण संख्या आता आटोक्यात येवू लागली आहे. 

गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात आढळलेली रुग्ण संख्या एक हजार पेक्षा कमी झाली आहे. जिल्ह्यात चोवीस तासांत 858 रुग्ण आढळले आहेत. 

जिल्ह्यात आज 858 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. काल बाराव्या स्थानावर असणारा पाथर्डी तालुका आज टॉपवर पोहोचला. जिल्ह्यातील एकमेव पाथर्डी तालुक्याने शंभरचा आकडा क्रॉस केला आहे .

अन्य सर्व तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचे आकडे शंभरी आत आहेत. नगर शहरामध्ये आज 54 व्या कोरोना बाधितांची भर पडली. नगर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही घटून आज 61 झाला आहे.

काल जिल्ह्यामध्ये 1152 कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. संगमनेर टॉपरवर होता. संगमनेर, नेवासा आणि श्रीगोंदा हे तीन तालुके निकाल शंभरी पार गेले होते. आज मात्र हे तिन्ही तालुके शंभरी आत आले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24