अहमदनगर ब्रेकिंग : १५ वर्षीय मुलाची आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नेवासे शहरातील शेंडे गल्ली येथे राहणाऱ्या मयूर राजकुमार संगपाळ या १५ वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली. राजकुमार सांगपाळ यांचे नेवासा बस स्थानकाजवळ चपलांचे दुकान आहे.

या प्रकारामुळे नेवासे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण समजलेले नाही. तपास हे. कॉ. तुळशीराम गिते हे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24