अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- नेवासा तालुक्यातील वरखेड येथील वय 8 ते 9 वर्षाच्या या अल्पवयीन मुलाचा सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तीकडून खून करण्यात आला आहे.
घरापासून अंदाजे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या चारीत डोक्यात दगड घालून खून केला असल्याची घटना घडली आहे मंगळवारी रामडोह रस्त्याच्या पाटचारी परिसरात डोके छिन्नविच्छिन्न केलेल्या अवस्थेत मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सोहम उत्तम खिलारी (वय 10 वर्षे) राहणार बुलढाणा (हल्ली वरखेड, ता. नेवासा) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे.
मयत सोहम हा गेल्या आठ-नऊ वर्षांपासून आपल्या दोन भाऊ व आईसह सावत्र वडिलांसमवेत वरखेड येथे वास्तव्यास होता. मयत सोहमचा आई व सावत्र वडील समाधान यांच्याकडून नेहमीच छळ होत असल्याची चर्चा वरखेड गावात ऐकायला मिळत आहे.
दहा वर्षीय बारकू हा आपली पोटाची भूक भागविण्यासाठी वेळप्रसंगी गावात भाकरी मागत होता. अशीच माहिती समोर आली आहे.
त्याचा स्वभाव खूपच गरीब होता. तो नेहमी भीतीच्या सावटात वावरत असल्याचेही ग्रामस्थ म्हणतात.
त्यामुळे त्याची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यासारखे बाहेरचे कोणीही असण्याची शक्यताच नाही. पोलिसांचाही तसाच कयास आहे.