अहमदनगर ब्रेकिंग : मालवाहू कंटेनरने शेतकर्‍यास उडविले, जागीच मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- घोगरगाव (ता. श्रीगोंदा) येथे लिंबू विक्रीसाठी सायकलवर चाललेल्या शेतकर्‍यास भरधाव वेगाने जाणार्‍या मालवाहू कंटेनरने उडविले. या अपघातात शेतकरी सुर्यभान दामू बेरड (वय 60 वर्षे) जागीच ठार झाले.

सदर प्रकरणी त्यांचे चुलते मयताचे चुलते नवनाथ विठोबा बेरड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मालमाहू कंटेनर क्रमांक आर.जे. 19 जी.जी. 5878 यावरील चालका विरोधात गुन्हा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि.14 जून रोजी संध्याकाळी 5:30 वाजता राजेंद्र गोरख बोरुडे यांनी फोन करुन तुमचे चुलते त्यांच्याकडील सायकलवरुन लिंबाची गोणी घेऊन जिल्हा परिषद शाळे समोरुन घोगरगाव कडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मालवाहू कंटेनरने (क्रमांक आर.जे. 19 जी.जी. 5878) जोराची धडक दिली.

त्यात तोल जाऊन ते रस्त्यावर पडले व सदर गाडीचे पुढचे चाक डोक्यावरुन गेल्याने त्यांचे जागीच मृत्यू झाल्याचे कळले. त्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी काही व्यक्तींसह जाऊन पाहिले असता सुर्यभान बेरड यांचा या अपघातात मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.

घटनेत प्रत्यक्षदर्शी असलेले राजेंद्र गोरख बोरुडे व संजय मानिक गुंजाळ यांनी सुर्यभान बेरड सायकलीवर लिंबू विक्रीसाठी मिरजगावच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.

कंटेनर चालकाने गाडी न थांबवता पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे वाहन गावातील ग्रामस्थांनी रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूल शाळेसमोर अडविला असल्याचे सांगितले असल्याचे फिर्यादीत नवनाथ विठोबा बेरड यांनी म्हंटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24