अहमदनगर ब्रेकिंग : केमिकल वाहतूक करणारा ट्रक भररस्त्यात पलटी झाला आणि दुचाकीस्वार …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  नगर दौंड महामार्गावर आज सकाळी बेलवंडी फाट्यानजीक निलगिरी ढाब्याजवळ एक केमिकल वाहतूक करणारा ट्रक भररस्त्यात पलटी झाला आहे.

अपघात झाल्याने ट्रक मधील सर्व केमिकल नगर दौंड या मुख्य रस्त्यावर सांडले होते त्यामुळे या रस्त्याने जाणारे जवळपास ३० पेक्षा जास्त दुचाकीस्वार त्याठिकाणी घसरून पडले असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यात जास्त कुणी जखमी झाले नसले तरी या रस्त्यावरील केमिकल मुळे एवढया मोठ्याप्रमाणात दुचाकीस्वार घसरून पडले आहेत अपघाताबाबत माहिती मिळाल्यानंतर बेलवंडी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24