अहमदनगर ब्रेकींग: जिल्हा रूग्णालयातून आरोपीचे पलायन !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Ahmednagar Breaking :- खूनाच्या प्रयत्न गुन्ह्यातील अटक आरोपी आकाश बाळू गायकवाड (वय 23 रा. सिव्हील हडको, अहमदनगर) याने जिल्हा रूग्णालयातून आज दुपारी पलायन केले.

तोफखाना पोलिसांनी त्याला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. दरम्यान त्याच्या शोधासाठी तोफखाना पोलिसांनी तातडीने पथके रवाना केली आहेत.

मुलीचे लग्न लावून देण्यास वडिलाने नकार दिल्याने आकाश गायकवाड याने मुलीच्या वडिलांवर कोयत्याने हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. नगर शहरामध्ये ही घटना घडली होती.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आकाश गायकवाड विरूध्द खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तोफखाना पोलिसांनी त्याला अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत होता. आज त्याला जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी आणले होते.

त्यादरम्यान त्याने रूग्णालयातून धूम ठोकली. दरम्यान त्याचा सोबत दोन पोलीस कर्मचारी असतानाही त्याने पळ काढल्याने एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. आरोपी गायकवाड याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24