अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील धानोरे शिवारात विष्णू दिघे वय ४८ या व्यक्तीचा मृतदेह जखमी अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
ही घटना खुनाची असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सोमवारी सकाळी धानोरे शिवारात उसाच्या शेतातील बांधाजवळ ही घटना उघडकीस आली.
या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षिका दिपाली काळे,श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके, पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ,उपनिरीक्षक मधुकर शिंदे व पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
विष्णू दिघे यांच्या डोक्यात जखमा आढळून आल्या आहेत. सोमवारी रात्री शव विच्छेदनानंतर मृत विष्णू दिघे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.