अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साईबाबा आणि पंढऱपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानच्या विश्वस्तपदावर वर्णी लागण्यासाठी राजकीय मंडळींकडून फिल्डिंग लावण्यात येत होती. अखेर आज या संस्थानचे विश्वस्तपद, अध्यक्षपदाच्या संदर्भात निर्णय झाला आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांची शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
रात्री उशिरा या निर्णयाची माहिती नगर जिल्ह्यात समजली. कोपरगावात ही माहिती समजताच काळे यांच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली
शिर्डी साई संस्थान अध्यक्षपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी दावा केला होता. मात्र, आज मुंबईत झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला.
दरम्यान साई संस्थानचा कारभार सध्या न्यायाधीशांकडे आहे. संस्थानवर स्थानिकांना संधी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार स्थानिक अध्यक्ष देण्यात आल्याचे समजते.
शिर्डी संस्थानवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार आमदार काळे यांची निवड अपेक्षित मानली जात आहे.