अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-मंगळवार दि.9 मार्च रोजी रात्री अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे बियरचे बॉक्स घेऊन जाणारा कंटेनर मध्यरात्री पलटी झाल्याने मोठे नुकसान झाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की वाळुज-पंढरपूर (औरंगाबाद) येथून टुबर्ग कंपनीची बियर कोल्हापूर या ठिकाणी पोहोचवण्यासाठी निघालेला कंटेंटर क्रमांक MH 26/AD 7642 हा शनिचौक-घोडेगाव येथून जात असताना हा अपघात झाला.
समोर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर व एक टँकर यांच्यात किरकोळ अपघात झाला होता ,अचानक समोर आल्याने अपघात टाळण्याच्या प्रयत्नात गाडी कंट्रोल न झाल्यामुळे हा बिअरचा कंटेनर चौकातील दुभाजकावर आदळुन पलटी झाला.
त्यातील बियर फुटल्याने मोठे नुकसान झाले ह्या अपघातात ड्रायव्हर जखमी झालेला आहे. या कंटेनर मध्ये 2000 बॉक्स टूबर्क बियर अंदाजे किंमत 45 लाख रुपये असल्याचे समजते.
सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे व त्यांचे सहकारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना ही अपघात झाल्याची बाब लक्षात आली.
त्यांनी त्या ठिकाणी तात्काळ 2 पोलीस तैनात केल्यामुळे थोड्या फार प्रमाणात बियर चोरी झाली. पोलीस आल्यामुळे बियरची चोरी रोखता आली.
अनेक ठिकाणी दारूच्या पलटी झालेल्या ट्रक मधून दारू चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलीस तैनात असल्याने तळीरामांची घोर निराशा झाली.