अहमदनगर ब्रेकिंग : भंडारदरा धरण भरले, पाणलोटात पावसाची संततधार कायम

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अजूनही पावसाचा जोर टिकून आहेत.

भंडारदरा धरण ९५.६५ टक्के भरले असून धरणाचा पाणीसाठा १० हजार ५५९ दशलक्ष घनफुटावर पोहचला आहे. ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट असून दरवर्षी धरणाचा पाणीसाठा १० हजार ५०० दशली घनफूट होताच धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जलसंपदा विभागाकडून जाहीर केले जाते धरण भरण्याची आता फक्त औपचारिकता राहिली आहे.

धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर टिकून राहिला, तर या दोन ते तीन दिवसात धरण भरण्याची शक्‍यता स्थानिक नागरीकांनी वर्तविली आहे अकोले तालुक्‍यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गत चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. भंडारदरा धरणाच्या पाण्यात सातत्याने वाढच होत आहे.

त्यामुळे आता धरण भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरवर्षी भंडारदरा धरण १५ ऑगस्टपूर्वीच भरण्याची परंपरा यावर्षी खंडीत झाल्याने धरण भरते की नाही, याची शंका धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मनात होती;

पंरतु आता भंडारदरा येथे गत २४ तासात ७० मीमी पावसाची नोंद झाली असून घाटघर येथे ८१ मीमी, पांजरे ७५ मीमी, वाकी ५१ मीमी तर रतनवाडी येथे तब्बल १२७ मीमी पावसाची नोंद झाली आहे.

कळसुबाई शिखराच्या परीसरातही जोरदार पाऊस पडत असून कृष्णावंती नदी दुथडी भरून वाहात आहे. वाकी लघु बंधाऱ्यावरुन ७८९ क्युसेक्सने पाणी नदीपात्रात वाहत असल्याने निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे.

Ahmednagarlive24 Office