श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर हा कारखाना पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण काल (गुरवारी) या कारखान्यात मोठा अपघात झाला. यात सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाले आहे.
नागवडे कारखान्याच्या अर्कशाळा विभागातील मळीसाठवण टाकी तापमान वाढून फुटल्याने जवळपास 4 हजार टन मळी वाहून गेली. ही घटना गुरुवारी (ता. 10) पहाटे घडली.
टाकीचा झालेला स्फोट एवढा भीषण होता, की त्याने शेजारची संरक्षक भिंत पडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेत कारखान्याचे सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समजली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि या टाकीची साठवणक्षमता साडेचार हजार टन असून, तीत 4 हजार 100 टन मळी साठविली होती. टाकी फुटल्याने ही मळी वाहून गेली. मात्र, सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.
टाकीचा झालेला स्फोट एवढा भीषण होता, की त्याने शेजारची संरक्षक भिंत कोसळली. कारखान्याचे सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शेजारच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले.
कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, सचिव बापूराव नागवडे, अर्कशाळा विभागप्रमुख बबनराव गोरे, सुरक्षा अधिकारी बाळासाहेब लगड यांनी घटनास्थळी धाव घेतली.