अहमदनगर ब्रेकींग : तरूणाचा विहिरीत मृतदेह आढळला !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील तरूणाचा मृतदेह अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील इंद्रायणी हॉटेलच्या पाठीमागे शेतातील विहिरीत आढळून आला.

त्या तरूणाने कर्जाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रसाद रघुनाथ साबळे (रा. पिंपळगाव माळवी ता. नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे.

दरम्यान प्रसादच्या जाण्याने त्याच्या परिवारासह मित्रांना धक्का बसला असून अवघ्या अकरा महिन्यापूर्वी प्रसादचा विवाह झाला होता,त्याच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून प्रसाद साबळे हा तरूण घरातून निघून गेला होता. त्याच्या घरच्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मिसिंगची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान रविवारी त्याचा मृतदेह अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील इंद्रायणी हॉटेलच्या पाठीमागे शेतातील विहिरीत आढळून आला.

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

प्रसादचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केला होता. प्रसादने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय त्याच्या चुलत भावाने पोलिसांसमोर व्यक्त केला आहे. पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Ahmednagarlive24 Office