अहमदनगर ब्रेकिंग : ६० फूट खोल दरीत कार कोसळली ! आणि…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-गुजरात येथील तिन तरूण भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी जात होते. मात्र त्यांच्या कारला अपघात होवून ती तब्बल ६० फूट खोल दरीत कोसळली.

या भीषण अपघातात केवळ देवाच्या कृपेनचे ते तिघे तरूण वाचले.ही घटना ही घटना रविवारी सकाळी सहा वाजलेच्या सुमारास संगमनेर तालुक्यात घडली.

याबाबत सविस्तर असे की, गुजरात येथील मितेश कथेरिया (वय ३५), भार्गव रामोलिया (वय २५, रा. सुरत), स्नेहल पोकीया (रा.भारुच, वय ३०) हे तिघे जण कारने (क्रमांक जी.जे.१६, सी.जी.७३३६) देवदर्शनासाठी नाशिक-पुणे महामार्गाने भीमाशंकरला निघाले होते.

रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास हे तरूण माहुली घाटातून जात असताना चालक मितेश याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट महामार्ग सोडून साठ ते सत्तर फूट खोल दरीत कोसळली.

कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने तिघेही तरूण बचावले. ते किरकोळ जखमी झाले. कार उलटल्याचे समजताच डोळासणे महामार्ग पोलीस अरविंद गिरी, साईनाथ दिवटे, रमेश शिंदे, योगीराज सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

क्रेनद्वारे कार दरीतून वर काढण्यात आली. रस्त्याचा अंदाज चालकाला न आल्याने कार थेट महामार्ग सोडून साठ ते सत्तर फूट खोल दरीत जाऊन कोसळली. भर वेगातील कारने पाच पलट्या घेऊनही आम्ही सुखरूप बचावल्याचे या तरूणांनी सांगितले.

घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग व घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाती कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. घडलेल्या घटनास्थळी मोठ मोठे दगडही असूनही हे तरूण बचावले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24