अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-पतीकडून होणाऱ्या रोजच्या मारहाणीला कंटाळून तक्रार देण्यासाठी विवाहिता पोलीस ठाण्यात गेली असता, तिच्या १३ महिन्यांच्या बाळाचे पती, सासू व दिर यांनी अपहरण केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की शिर्डीच्या द्वारकानगर येथील पूनम रतन धिवर या पतीविरोधात तक्रार देण्यासाठी दि. ४ जून रोजी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गेल होती.
त्यावेळी त्यांचा पती रतन सुभाष धिवर, सासू सुशिला सुभाष धिवर, दीर दिपक सुभाष धिवर (सर्व राहाणार द्वारकानगर, शिर्डी) यांनी ४ जून रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास बाळाला पळवून नेले, अशी पूनम धिवर यांनी दिली आहे.
पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी फिर्यादीवरून वरील तीन आरोपींविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर २०३/२०२१ नुसार, भा.दं.वि. कलाम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दातरे यांनी दिली.
महिलेचा दीर दीपक धिवर यास पोलिसांनी अटक करून राहाता न्यायालयापुढे हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली. पती व सासू यांचा शोध सुरू असल्याची माहिती शिर्डी पोलिसांनी दिली