अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील सावळीविहिर- भरवस राज्य मार्ग सात लगत बिल्डींग मटेरियल विक्री करणाऱ्या शंकर चौधरी (वय २५ वर्ष) या व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सावळीविहिर-भरवस रस्त्यावरील रहिवासी शंकर चौधरी दहा वर्षापासून महालक्ष्मी ट्रेंडर्स या नावाने बिल्डींग मटेरियल व्यवसाय करीत होते.
या ठिकाणी शंकर चौधरी भाऊ, भावजय व दोन लहान मुले वास्तव्यास होती. शंकर चौधरी यांच्या बहिणीचे लग्न असल्यामुळे भाऊ, भावजयी व लहान मुले आपल्या मुळगावी राजस्थानला गेली होती.
१० रोजी राजस्थान येथे गेलेल्या भावाने शंकर चौधरी यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होत नव्हता.
त्यांच्या भावाने वावी येथे राहत असलेल्या दुसऱ्या भावाशी संपर्क करून शंकर चौधरी बाबत चौकशी करण्यास सांगितले.
त्यांचा भाऊ सुरेगाव येथे आला असता त्याने दुकानाचे शटर उघडून पाहिले त्यावेळी शंकरने पत्र्याच्या शेडमध्ये अँगलला गळफास घेतल्याचे दिसून आले. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.